Join Whatsapp Group

Join Telegram Group

होमगार्ड नोंदणी 2024 जाहीरात | Home Guard Bharti 2024

होमगार्ड बृहन्मुंबई येथील रिक्त असलेल्या 2 हजार 549 पुरुष व महिला होमगार्डच्या जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले होते. या होमगार्ड नोंदणीकरिता 2 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

होमगाई बृहन्मुंबईकरिता पुरुष व महिलांनी एकूण 2 हजार 247 अर्ज केले आहे. याकरिता उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरिता 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत आयोजन करण्यात आले होते. काही  तांत्रिक  अडचणीमुळे  उमेदवारांची  कागदपत्रे पडताळणी तसेच  मैदानी चाचणी घेणे शक्य होत नसल्याने याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

नोंदणी केलेल्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन समादेशक, होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


१. होमगार्ड सदस्यत्व – महाराष्ट्रातील होमगार्ड संघटनाही शासन संचलित पुर्णतः मानसेवी तत्वावर आधारीत आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे सदस्यत्व तीन वर्षांकरीता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे ३-३ वर्षांच्या टप्प्याने वयाच्या ५८ वर्षांपर्यंत पुनर्नोदणीकृत करता येते.

२. होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य- होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपतकालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई / महामारीकाळात, संपकाळात प्रशासनांस मदतकार्य अशी कर्तव्ये दिली जातात. –

३. होमगार्डना देय भत्ते – होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु.५७०/- कर्तव्य भत्ता व रु.१००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षणकाळात रु.३५/- खिसाभत्ता व रु.१००/भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु.९०/- कवायत भत्ता दिला जातो.

४. शास्ती – होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतू अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरीता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या / कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या / आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम १९४७ कलम ७ (१) अन्वये बडतर्फ किंवा रु.२५०/- इतका दंड / तीन महीन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे.

५. होमगार्ड नोंदणी – होमगार्ड नोंदणीकरीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळणेकरीता कोणत्याही इतर मार्गाचा ( वशिला किंवा लाच) अवलंब करु नये. याकरीता कोणीही लाच / पैशाची मागणी केल्यास अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, रायगड किंवा मा. जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक रायगड यांचेशी संपर्क साधावा.

ऑनलाईन अर्ज असा करावा

होमगार्ड नोंदणी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर HGs ENROLLMENT  या मेनूमधून ऑनलाईन एनरॉलमेंट फॉर्म हा सबमेनू निवडावा. सर्व प्रथम जिल्हा निवडावा, 12 अंकी आधार क्रमांक भरावा, यानंतर लिंग, पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ईमेल आयडी माहिती भरावी, ज्या प्रकारची तांत्रिक अर्हता आहे, त्यांची संख्या निवडावी. जन्मदिनांक, उंची व यापूर्वी होमगार्ड सेवेची स्थिती निवडावी. अर्ज सादर केल्यावर प्रिंट काढावी. पडताळणीकरीता येताना ही प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी.

६. होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे –

१. सैनिकी गणवेश परीधान करणेचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण.

२. ३ वर्षे सेवापुर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वनविभाग व अग्निशमन दलामध्ये ५% आरक्षण.

३. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.  

४. गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार/पदके मिळविण्याची संधी.

५. स्वत:चा व्यवसाय / शेती इ. सांभाळत देशसेवा करण्याची संधी.

होमगार्ड नोंदणी नियम व अटी

१. होमगार्ड पात्रतेचे निकष :-

अ) शैक्षणिक पात्रता – कमीतकमी १० वी उत्तीर्ण (SSC)

ब) शारिरीक पात्रता

१. वय २० वर्षे पुर्ण ते ५० वर्षांच्या आत. (दि. १६/८/२०२४ रोजी ) –

२. उंची – पुरुषांकरीता – १६२ सें. मी. व महिलांकरीता १५० सें. मी.

३. छाती – ( फक्त पुरुष उमेदवारांकरीता ) (न फुगविता किमान ७६ सें. मी. कमीतकमी ५ सें.मी. फुगविणे आवश्यक )

होमगार्ड नोंदणी आवश्यक कागदपत्र :-

१. रहीवासी पुरावा – आधारकार्ड, मतदान ओळखपत्र (दोन्ही अनिवार्य) .

२. शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.

३. जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.

४. तांत्रिक अहर्ता धारणकरीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र.

५. खाजगी नोकरीकरीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.

६. ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र.

शारिरीक क्षमता चाचणी :- उमेदवारांना प्रत्येक शारिरिक चाचणी प्रकारात ४०% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत.

जिल्हा निहाय माहितीपत्रक /जाहीरातीकरीता खालील लिंक वर क्लिक करा.
 उमेदवारांना नोंदणीचे माहितीपत्रक काळजीपुर्वक वाचून अर्ज करावा.
Sr.जिल्हाअर्ज भरण्याचा कालावधीजिल्हा निहाय अर्ज भरण्याकरीता आवश्यक माहिती.उमेदरांकरीता पुढील सुचना
1.सातारादि. 15/07/2024 ते 31/07/2024    सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024अर्ज भरणेच्या कालावधीनंतर प्रसारीत केल्या जातील
2.नांदेडदि. 25/07/2024 ते 14/08/2024    नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
3.रत्नागिरीदि. 25/07/2024 ते 14/08/2024    रत्नागिरी जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
4.जळगावदि. 25/07/2024 ते 14/08/2024    जळगाव जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
5.चंद्रपूरदि. 25/07/2024 ते 10/08/2024    चंद्रपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
6.यवतमाळदि. 26/07/2024 ते 17/08/2024    यवतमाळ जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
7.सिंधुदूर्गदि. 25/07/2024 ते 14/08/2024    सिंधुदूर्ग जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
8.धुळेदि. 25/07/2024 ते 14/08/2024    धुळे जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
9.हिंगोलीदि. 25/07/2024 ते 14/08/2024    हिंगोली जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
10.अमरावतीदि. 25/07/2024 ते 05/08/2024  अमरावती जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
11.बीडदि. 26/07/2024 ते 16/08/2024  बीड जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
12.धाराशिवदि. 25/07/2024 ते 14/08/2024  धाराशिव जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
13.वाशिमदि. 26/07/2024 ते 14/08/2024  वाशिम जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
14.भंडारादि. 26/07/2024 ते 16/08/2024  भंडारा जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
15.नंदुरबारदि. 26/07/2024 ते 14/08/2024  नंदूरबार जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
16.गडचिरोलीदि. 25/07/2024 ते 14/08/2024  गडचिरोली जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
17.रायगडदि. 26/07/2024 ते 16/08/2024  रायगड जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
18.लातूरदि. 26/07/2024 ते 16/08/2024  लातूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
19.पुणेदि. 26/07/2024 ते 11/08/2024  पुणे जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
20.सांगलीदि. 25/07/2024 ते 14/08/2024  सांगली जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
21.नाशिकदि. 26/07/2024 ते 14/08/2024  नाशिक जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
22.कोल्हापूरदि. 26/07/2024 ते 14/08/2024  कोल्हापूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
23.वर्धादि. 26/07/2024 ते 15/08/2024  वर्धा जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
24.छ.संभाजीनगरदि. 27/07/2024 ते 14/08/2024 छ.संभाजीनगर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
25.नागपूरदि. 30/07/2024 ते 24/08/2024 नागपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 
26.जालनादि. 28/07/2024 ते 17/08/2024 जालना जिल्हा होमगार्ड नोंदणी -2024 

Leave a Comment